July 27, 2026

15ऑगस्ट रोजी न्यू हायस्कूल गदाना प्रशाला मध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रम अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा.

दि.१५ ऑगस्ट २०२३.

आज 15ऑगस्ट रोजी न्यू हायस्कूल गदाना प्रशाला मध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रम अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी प्रतिमेचे पूजन प्रशालेचे शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुर्णाताई आधाने यांनी केले. व ध्वजारोहण प्रशालेचे शालेय समिती अध्यक्षा सन्माननीय श्रीमती पूर्णाताई अधाने यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर आर पवार सर, ,सर्व शालेय समिती सदस्य, गदाना गावाचे सरपंच श्री काकासाहेब अधाने , तंटामुक्ती अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, गावातील सर्व सन्माननिय नागरिक, प्रशालेचे माजी विद्यार्थी, तसेच न्यू हायस्कूल चे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत गदाना येथे ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी गावातील भारत देशाच्या संरक्षानार्थ कर्तव्य बजावणाऱ्या सर्व आजी-माजी सैनिकांचा ग्रामपंचायतींच्या वतीने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल,हार,फेटा बांधून सन्मान करण्यात आला, यावेळी नंदूरबार जिल्हा न्यायालयाचे, न्यायाधीश मा. कुलकर्णी साहेब,सरपंच,उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्राप. सदस्य, सोसा.चेअरमन व सर्व सोसा. सदस्य,गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील,एमएसइबी उपकेंद्र गदाना सहा.अभियंता श्री कुंदे साहेब व लाईनमन,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद जि. प. शाळा गदाना, बोरवाडी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद न्यू हायस्कूल गदाना, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती,कर्मचारी, बचत गट सदस्य,पत्रकार,ग्रामस्थ इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

You may have missed