www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 12 फेब्रुवारी 2026
खुलताबाद | प्रतिनिधी : अशोक अधाने
गंगापूर–खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज दि १३ फेब्रुवारी २०२३
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग परिसरात स्वच्छता मोहिम राबवत पवित्र तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी त्यांनी परिसरातील दुकानदार व व्यावसायिकांशी संवाद साधत स्पष्ट इशारा दिला की, मंदिर परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
🔹 पहिल्यांदा कचरा टाकताना आढळल्यास ₹1,000 दंड
🔹 दुसऱ्यांदा आढळल्यास ₹5,000 दंड
🔹 वारंवार नियमभंग झाल्यास संबंधित दुकान बंद करण्याची कारवाई
आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले की, “घृष्णेश्वर हे देशातील बारावे ज्योतिर्लिंग असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पवित्र स्थळाची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासन, दुकानदार आणि नागरिक यांनी सहकार्य केल्यास परिसर आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल.”
स्वच्छता मोहिमेदरम्यान स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे.
“श्रद्धा जपा – स्वच्छता राखा” असा संदेश यावेळी देण्यात आला.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन