खुलताबाद : श्रावण महिन्याच्या पवित्र निमित्ताने खांडीपिंपळगाव येथील जागृत देवस्थान भेंडाळा मारुती मंदिरात प्रत्येक शनिवारी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा सादर करणार आहेत. महोत्सवाची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी भागवताचार्य ह.भ.प. सोपान महाराज सानप यांच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी खान्देशरत्न ह.भ.प. भरत महाराज चौधरी (म्हसवाडीकर), २९ ऑगस्ट रोजी विदर्भरत्न विनोदाचार्य ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर आणि ५ सप्टेंबर रोजी प्रेममूर्ती गुरुवर्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा होणार आहे.
कीर्तनादरम्यान ह.भ.प. अनिकेतदादा लांडे व ह.भ.प. यज्ञेश महाराज माळी हे मृदंगाची साथ करणार असून, ह.भ.प. गायनाचार्य सुनील महाराज पवार आणि नारायण महाराज खिल्लारी हे भजन-गायनाची सेवा सादर करणार आहेत.
सर्व कीर्तने संबंधित शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत. यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या धार्मिक महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
More Stories
गदाणा जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड!
गदाणा जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!