August 21, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर

शनिवार दि. 08 ऑगस्ट 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने | मो. 9623871987

वंचित बहुजन आघाडी खुलताबाद तालुका आढावा बैठक तालुका अध्यक्ष गणेश तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष रुपचंदजी गाडेकर, जिल्हा सचिव मुक्तार भाई सय्यद, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार याच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०६ ऑगस्ट गुरुवारी रोजी शासकीय विश्रामगृह, खुलताबाद येथे संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रभावित होऊन, यावेळी खुलताबाद तालुक्यातील गदाणा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार ) गटाचे सर्कल अध्यक्ष ओम नवनाथ जिते यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी त्यांचा पक्षांत सत्कार केला. यावेळी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पच्छिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा सचिव मुक्तार भाई सय्यद, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार, खुलताबाद तालुका अध्यक्ष गणेश तांदळे, तालुका महासचिव राजाराम घुसळे,तालुका सल्लागार सुरेश गवळे, तालुका सदस्य कैलास गिरी,विलास सोनवणे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आगामी काळात अनेक युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याचे तालुका अध्यक्ष गणेश शांतीनाथ तांदळे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.कारण अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांना कळून चुकले की, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि वंचित समूहाला न्याय देण्याचे काम फक्त अॅड. प्रकाश आंबेडकर करू शकतात त्यामुळे त्यांच्या विचारांना प्रभावित होऊन अनेक जण पुढील काळात निश्चितच वंचित बहुजन आघाडीत सामील होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होऊन खुलताबाद तालुक्यात लवकरच संघटन बांधणी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.