www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 12 फेब्रुवारी 2026
खुलताबाद | प्रतिनिधी : अशोक अधाने
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वेरूळ येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये विविध स्वयंसेवी संस्था (NGO), शासकीय कर्मचारी, सफाई कामगार यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यासोबतच गंगापूर–खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब व त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामार्फतही स्वतंत्रपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वेरूळ हे बारावे व अंतिम महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असल्याने भाविकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान मंदिर परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसरातील कचरा साफ करण्यात आला. स्वच्छतेसोबतच नागरिक व भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त उपक्रमाचे भाविक व स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे तीर्थक्षेत्राची पवित्रता व सौंदर्य अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस