April 16, 2026

शिवसंगमेश्वर विरमगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 12 फेब्रुवारी 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने

विरमगाव ता.रत्नपूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंगमेश्वर या प्राचीन व ऐतिहासिक मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहास मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती लाभत असून, महादेव व पार्वती यांचे एकाच ठिकाणी दर्शन घेण्याचा दुर्मिळ लाभ भाविकांना येथे मिळत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी येथे राज्याच्या विविध भागांतून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. महादेव व पार्वती यांचा संगम याच ठिकाणी झाल्याची पुरातन आख्यायिका असल्याने या मंदिरास विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी महाशिवरात्र असून त्यानंतर सोमवारी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.
या अखंड हरिनाम सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे दररोज गावकऱ्यांसाठी चूलबंद आमंत्रण असते. गावातील लहान-थोर, महिला-पुरुष सर्वजण उत्स्फूर्तपणे या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. महाराज मंडळींच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी पंगतीत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.
गावातील नवतरुण, समाजसेवक, कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. रात्री हरीकीर्तनानंतर भोजनाची व्यवस्था असते. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सुरू असतात, त्यानंतर चूलबंद आमंत्रण महाप्रसाद दिला जातो.
दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह 15 फेब्रुवारी 2026 रोजी भंडाऱ्याच्या महाप्रसादानंतर समारोपाला होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गावातील कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केले असून, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.