June 13, 2026

राज्यात इयत्ता १२वीची परीक्षा सुरू | कडक बंदोबस्तात पहिला दिवस

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

दिनांक : 09 फेब्रुवारी 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने

राज्यात इयत्ता १२वीची परीक्षा सुरू | कडक बंदोबस्तात पहिला दिवस

खुलताबाद : राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे तसेच परीक्षेतील पारदर्शकता टिकून राहावी, या उद्देशाने प्रशासन, शिक्षण विभाग व पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे. परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त, प्रवेशद्वारावर तपासणी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच भरारी पथकांद्वारे अचानक तपासण्या करण्यात येत असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास त्वरित आळा घालण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा ताण न देता निर्भय, सुरक्षित व शांत वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम सुरू केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियानामुळे गुणवत्तेला प्रोत्साहन, शिस्तबद्ध परीक्षा प्रक्रिया व शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया पालक व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

You may have missed