April 15, 2026

7569 मतांसह भाजपच्या रेखा प्रकाश चव्हाण यांची बाजी; जिल्हा परिषद निवडणुकीत विजय

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

📅 दिनांक : 09 फेब्रुवारी 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने

——————————————

रेखा प्रकाश चव्हाण यांचा 1675 मतांनी विजय; पंचायत समितीत मंदाबाई वाकळे व सुनीता खंडागळे विजयी

खुलताबाद | दि. 09 फेब्रुवारी 2026 :
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती खुलताबाद अंतर्गत पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा अंतिम निकाल (परिशिष्ट–20 नुसार) जाहीर झाला असून, या निकालात एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषद – निवडणूक गण क्रमांक 26 (गदाना) मधून
रेखा प्रकाश चव्हाण (भारतीय जनता पार्टी) यांनी 7569 मते मिळवत सोनाली प्रविण चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा 1675 मतांनी पराभव करून जिल्हा परिषद सदस्यपदाचा विजय मिळविला. या मतदारसंघात एकूण 22335 वैध मते नोंदविण्यात आली.

पंचायत समिती – निवडणूक गण क्रमांक 52 (गदाना) मधून
मंदाबाई बद्रीनारायण वाकळे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 3489 मते मिळवत ज्योती धनाजी आढाव (भारतीय जनता पार्टी) यांचा 329 मतांनी पराभव केला. या गणात 11686 वैध मते पडली.

पंचायत समिती – निवडणूक गण क्रमांक 51 (ताजणापूर) मधून
सुनीता संजय खंडागळे (भारतीय जनता पार्टी) यांनी 3258 मते मिळवत सिंधू संजय काले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा 701 मतांनी पराभव करून विजय संपादन केला. या मतदारसंघात 10649 वैध मते नोंदविण्यात आली.

तिन्ही गणांतील मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शांततेत व पारदर्शकपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून, लोकशाही प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे प्रशासनातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.