April 21, 2026

यशोदीप विद्या मंदिर शाळेत विजय चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन

दि.१८ सप्टेंबर २०२३ 

www.themaharashtratoday.com

खुलताबाद येथील महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदिप विद्या मंदिर आणि मराठी माध्यमिक विद्यालय या शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य विजय चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. लक्ष्मी भारती, वन पर्यावरण मंत्रालय भारत सरकारच्या सदस्या उषा भालेराव, समता सैनिक दलाच्या जिल्हाध्यक्षा रेखा राऊत, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षा विद्या शिरसाट, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा शकुंतला साबळे, शहराध्यक्षा रेखा मुळे, शालेय समितीचे अध्यक्ष दिनेश सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासावर भाषणे केली. तर अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक महेश काळे, मराठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय ठुबे, कमलाकर व्यवहारे, तैयब पठाण, राहुल चाटसे, सोमसिंग देवरे, राजाभाऊ वायाळ, सुनिल जाधव, रुबाब तडवी, प्रविण डघळे, कलीम शेख, सुनिल पाटील, अण्णासाहेब निकम, राजु बारगळ, कैलास कांजुने, पल्लवी जाधव, अर्चना हजारे, आरती कांजूने आदींसह विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ वायाळ यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.