छत्रपती संभाजीनगर | दि. ११ मार्च २०२५ | प्रतिनिधी |
✍️ अशोक अधाने
📞 मो. 9623871987
www.themaharashtratoday.com
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) महावितरण कार्यालय बिडकीन उपविभागातील कनिष्ठ अभियंता महेश काशिनाथ घावट (वय ३५ वर्षे) याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार (वय ३६ वर्षे, पुरुष) यांनी आपल्या शेतातील पाच सौरपंपांसाठी महावितरणकडे मंजुरीसाठी अर्ज केला होता. संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करून देखील मंजुरी देण्यासाठी अभियंता घावट याने २५,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २०,००० रुपयांवर आली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे दि. १० मार्च २०२५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर, नियोजित सापळा रचून ११ मार्च २०२५ रोजी महावितरण कार्यालयाच्या समोर असलेल्या रसवंती गृहासमोर लाच स्वीकारताना घावट याला रंगेहात पकडण्यात आले.
◾ आरोपीच्या अंगझडतीत पुढील वस्तू जप्त
वन + ७ कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१०,०००)
₹४०० रोख रक्कम
आरोपीचा मोबाईल पुढील तपासासाठी ताब्यात
◾ अधिकाऱ्यांची मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक केशव दिंडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
◾ नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येण्याचे आवाहन
लाचलुचपत विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारविरोधी तक्रारसाठी संपर्क:
टोल-फ्री क्रमांक: 1064
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग: 9923023361
पोलीस उपअधीक्षक: 9923247986 / 9004492163
More Stories
मुख्याध्यापक बी. डी. जाधव यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा
गदाना येथे नृसिंह महाराज पंचमी उत्सवाला उत्साहात सुरुवात
जिल्ह्यात मतदार मॅपिंग ७३.६९% पूर्ण; जनजागृतीला वेग देण्याचे निर्देश