June 13, 2026

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी – सावंतवाडीत संघटनेची नियोजन बैठक

✍️ वार्ताहर: अशोक अधाने
📞 मो. 9623871987

www.themaharashtratoday.com

सावंतवाडी | दि. १२ मार्च २०२५ | प्रतिनिधी

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे आयोजन येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर आणि त्यांच्या कार्यकारी टीमने अधिवेशनाच्या प्रत्येक घटकाचे बारकाईने नियोजन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले आणि त्यांच्या टीमने प्रत्यक्ष सावंतवाडी येथे भेट देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली तसेच इतर नियोजन अंतिम केले.

संघटनेच्या पुढील कार्यवाहीसाठी सर्व पत्रकारांना सभासद नोंदणी, ओळखपत्र नोंदणी तसेच स्मरणिकेसाठी जाहिराती संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भव्य महाअधिवेशनाच्या निमित्ताने डिजिटल पत्रकारितेतील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून, राज्यभरातील पत्रकारांचा उत्तम स्नेहसंमेलनात्मक मेळावाही यावेळी होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या या ऐतिहासिक अधिवेशनासाठी पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

You may have missed