News
The Maharashtra Today
दिनांक 9 सप्टेंबर 2023 शनिवार रोजी खुलताबाद तालुका स्तरिय राष्ट्रीय विज्ञान नाटयोउत्सव 2023-24 साजरा करण्यात आला याप्रसंगी खुलताबाद तालुक्यातील शाळाची ही स्पर्धा समंत भद्र विद्या मंदिर येथे वेरूळ येथे घेण्यात आली.नाट्य निवड साठी पाच विषय होते
१.(अन्न (मिलेट) श्रेष्ठ आहार),
२. (खाद्य सुरक्षा)
३.(दैनंदीन जीवनातअधूनिक त्रंत्रज्ञान)
४.(आरोग्य सेवेतील सध्याची (वर्तमान) प्रगती).
५(समजातील अंधश्रद्धा/अंधविश्वास) या विषयाशी अनुसरून शाळानी नाटकातून विषय स्पष्ट केले.
याप्रसंगी समंतभद्रा विद्या मंदिर वेरूळचे मा.मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत गुलाबचंद बोराळकर सर यांच्या हस्ते नाट्य उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच समंत भद्र विद्या मंदिर वेरुळ चे पर्यवेक्षक तसेच शालेय अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य श्री सुकुमार नवले सर प्रमूख पाहुणे पदी होते यांनी नाट्य महोत्सवातील शाळांच्या विद्यार्थ्यांना नाटकातून विज्ञानिष्ठ संकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कशाप्रकारे नाटक विज्ञानातून स्पष्ट करावे मग ते अन्नसुरक्षा, आरोग्य, अथवा भरडधान्य ,अंधश्रद्धा,अंधविश्वास असेल या विषयाना अनुसरून सरांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात तालुक्यातील घोडेगाव येथिल सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथील शाळेचा प्रथम क्रमांक आला तसेच समंतभद्र विद्या मंदिर वेरुळ या शाळेचा दुसराक्रमांक आला प्रथम आलेल्या नाट्य महोत्सवात सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री संजय गोमलाडू सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे व संजय गोमलाडू सरांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. साईनाथ पा जाधव साहेब,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.संदिप जाधव सर ,शाळेचे मुख्यध्यापक खैरनार सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबचंद बोराळकर सर, व प्रमूख पाहुणे सुकुमार नवले सर , यांनी सत्कार केला व डी.आर.जैन सर,सुहास मिश्रिकोटकर सर व अंकुश ठोळे सर याणी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शभेच्छा दील्या.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन