शुक्रवार दि. 07/09/2023 रोजी राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव ता.खुलताबाद जि.औरंगाबाद
येथे विद्यार्थ्यांना आय. सी. आय. सी. आय. फाऊंडेशन कडुन महाविद्यालयात “आर्थिक साक्षरता” या विषयावर शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी साईसेवा बहुविध प्रतिष्ठान संचलित घोडेगाव चे अध्यक्ष मा.साईनाथ पाटील जाधव साहेब,
आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशनचे संजय पोतदार साहेब, जोशी साहेब हे उपस्थित होते.
आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशनचे संजय पोतदार यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना बचत डी. आर. डी. ऑनलाईन फ्रॉड,भारत सरकारच्या योजना याविषयी माहिती दिली. याचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उपयोग होईल.
प्रोजेक्टरच्या साहाय्याने विविध विषयांवर मार्गदर्शन शिबीर पार पडले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व यांनी परिश्रम घेतले
More Stories
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून देवयानी पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल