November 16, 2025

वंचित तर्फे गट विकास अधिकारी खुलताबाद यांना निवेदनाद्वारे मागणी.

www.themaharashtratoday.com

खुलताबाद : आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे मा. योगेश बन जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम मिलिंद बोर्डे जिल्हा महासचिव बाबा पाटील जिल्हा संघटक यांच्या प्रमुख उपस्थितीत व खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात आज पंचायत समिती खुलताबाद गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले की, जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनेअंतर्गत 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढची मागणी करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की,  जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत 20% उपकर निधी मधून मागासवर्गीय लाभार्थ्यांना 100% अनुदानावर वैयक्तिक लाभ दिल्या जातात व अपंगांना 5% मधुन विनाअट घरकुल व वैयक्तिक आथिर्क मदत दिली जाते  त्या सर्व योजनेला 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी व निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी व या अगोदर प्रस्ताव मागविले परंतु त्याला प्रसिद्धी दिली नाही त्यामुळे सर्वसामान्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शौचालय अनुदान गेल्या दोन वर्षापासून लाभार्थी यांना मिळाले नाही रमाई आवास, शबरी, पंतप्रधान, अहिल्यादेवी होळकर या घरकुल योजनेचे सुद्धा प्रस्ताव मागून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी आपल्या स्तरावरून ग्रामसेवकांना पत्रव्यवहार करून प्रस्ताव मागवावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी खुलताबाद तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे याप्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन.उपोषण, इत्यादी करण्यास भाग पडेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी, राजाराम घुसाळे, अण्णा बनकर, कैलास बनकर, सोमीनाथ काळे, उत्तम भालेराव, आशोक अल्हाड, गजानन भालेराव, आर जे सोनवणे, अरुण साहेबराव, कलीम पठाण व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.