April 23, 2026

अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला..! पोलीस चौकशी सुरु..!

प्रतिनिधी : अशोक अधाने

९६२३८७१९८७

www.themaharashtratoday.com

( खुलताबाद )

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२४

१११ गंगापूर – खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला..! सोबत दोघांची प्रकृती गंभीर..!

गंगापूर – खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश सोनवणे यांच्यासह इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

आचारसंहितेचा प्रचार संपल्यानंतर सुरेश सोनवणे आणि त्यांचे सहकारी धामोरी फाटा येथून प्रवास करत असतांना हा हल्ला झाला असल्याचे समजते. जखमी अवस्थेत सुरेश सोनवणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सहा टाके पडले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या प्राणघातक हल्ल्यामुळे तालुक्यातील राजकारण व चर्चेला उधान आलेलं असून हा सोनावणे यांना अपक्ष असतांनाही लोकप्रियता मिळाल्याने असा हल्ला होऊ शकतो अशी तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सुरेश सोनवणे हे अपक्ष उमेदवार असूनही तालुक्यातील जनतेच्या मनात त्यांनी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली. यामुळे त्यांचे राजकीय विरोधक अस्वस्थ झाले असून या हल्ल्यामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सुरेश सोनवणे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही घटना मला रोखण्यासाठी केलेल्या राजकीय कटाचा भाग आहे. जनतेच्या प्रेमामुळे मला भरघोस पाठिंबा मिळत असल्याने विरोधक घाबरले आहेत.”

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या हल्ल्याचे नेमके कारण आणि दोषी कोण आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या घटनेबाबत निलेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोबत असलेल्या जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.