www.themaharashtratoday.com
वार्ताहर: अशोक अधाने, खुलताबाद (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर)
दि.२७ डिसेंबर २०२४
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ खुलताबाद तहसील कार्यालय येथे सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
या प्रसंगी विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने समाजात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले.
तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दोषींना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनातून सर्व धर्मीय बांधवांनी समाजातील सलोख्याचा संदेश दिला.
कार्यक्रमास खुलताबाद तालुक्यातील नागरिकांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवरांनी हजेरी लावली. हा निषेध आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
— वार्ताहर अशोक अधाने.
9623871987
More Stories
पक्षी ‘पाकोळी’ पक्षास निसर्गमित्राने दिले जीवनदान असंख्य पक्षांना दिले जीवनदान; सेवेतून मिळतो आनंद – देविदास थोरात
संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा भोवला? तामिळनाडूत तीन IPS अधिकारी निलंबित
‘सावंगी ते मिटमिटा १२ किमी ग्रीनफिल्ड रिंग रोड’ प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा, यासाठी विभागीय आयुक्त साहेबांना सविस्तर निवेदन