www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 06 डिसेंबर 2025
छत्रपती संभाजीनगर —
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन MUPTA संघटनेचे नेते संभाजी वाघमारे आणि अमोल सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजिक बांधिलकी आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण, समाजसेवक योगेश आचलखांब, प्राध्यापक दीपक पाईकराव, प्रा. सोनाजी गवई, युवा नेतृत्व संतोष अंभोरे, वाल्मीक पगारे, विशाल पठारे, सारा गोपनारायण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरातून समाजात मानवतेचा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आला. प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन