April 23, 2026

सिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

www.themaharashtratoday.com

 प्रतिनिधी : अशोक अधाने

मोबाईल नं. 9623871987

दि. 27 नोव्हेंबर 2025

छत्रपती संभाजीनगर :
रमाई प्रतिष्ठान, सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय पडेगाव, सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सानिका कॉलेज ऑफ बी-डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी संविधान दिन सिद्धार्थ महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी भूषविले, तर प्रा. सुनील मगरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेची शपथ वाचनाने झाली.

प्राचार्य डॉ. वानखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी कार्याचा उल्लेख करताना देशाच्या सामाजिक न्यायव्यवस्थेच्या उभारणीत त्यांच्या योगदानाचे स्मरण करून दिले. “संविधान हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दस्तऐवज आहे. यात दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये नागरिकांना दिशा देतात,” असे ते म्हणाले.

प्रमुख अतिथी प्रा. सुनील मगरे म्हणाले, “भारतीय रिझर्व्ह बँकेचे स्वरूपही डॉ. आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या तत्वांवर आधारित आहे. समानता, न्याय आणि अधिकारांसाठी त्यांनी उभारलेला लढा आजही मार्गदर्शक ठरतो.”

कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक पाईकराव यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य न. गोपनारायण यांनी केले.

या प्रसंगी प्रा. अशीत शेगावकर, प्रा. योगिता मोरे, पूजा साळवे, डॉ. रेणुका जाधव, डॉ. निखिल, डॉ. आकाश, डॉ. नीलिमा यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.