June 24, 2026

स्वातंत्र्य दिन शहरी बेघर निवारागृहात उत्साहात साजरा

www.themaharashtratoday.com

दिनांक – 15 ऑगस्ट 2025

📍 संभाजीनगर | प्रतिनिधी |  अशोक अधाने 

संभाजीनगर महानगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारागृहात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बार्टी आणि एचडीएफसी बँकेच्या डब्ल्यूबीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात निवारागृहातील बेघर, अनाथ, दिव्यांग, मनोरुग्ण, वृद्ध नागरिक आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे झेंडावंदन एचडीएफसी बँकेचे ऑपरेशन विभागाचे सर्कल हेड श्रीनिवास कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश सोनवणे उपस्थित होते.

या कार्यक्रमात 50 बेघर लाभार्थ्यांना किराणा साहित्य, मिठाई, बेडशीट आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक बोधी संस्थेचे प्रशांत दंदे यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मनपा उपायुक्त लखीमचंद चव्हाण आणि समाज विकास अधिकारी विनोद परदेशी यांनी केले.

या वेळी बार्टीतर्फे रवी कळसकर, एचडीएफसी बँकेचे सिटी हेड विशाल कदम, चंद्रकांत पाटील, कृष्णा चौधरी, मनोज इंदासराव, सुजाता मोटे, वरुण नगरकर, संतोष बचारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक आकाश बेलकर, संजय दैवतवाल आणि नितीन वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

You may have missed