www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 15 डिसेंबर 2025
सिद्धार्थ इन्स्टिट्यूट मध्ये डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षकांनी नवगत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजन कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यात उत्साह निर्माण केला .
यावेळी स्वागत समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. रखमाजी जाधव हे उपस्थित होते . तसेच संस्थेचे संचालक प्रा सुनील मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती . सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर वानखडे आणि डी फार्मसी च्या प्राचार्य प्रायोगिता शिंदे ह्या अध्यक्षस्थानी होत्या .
यावेळी रखमाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घ्यावे आणि डी फार्मसी चे गुण आत्मसात करावे असे ते म्हणाले, तर प्रा सुनील मगरे यांनी महाविद्यालयात सर्वांचे स्वागत करून महाविद्यालयातील सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आल्या त्यांचे विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा .असे ते म्हणाले
तर सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी डी फार्मसी ह्या अभ्यासक्रमाचे महत्त्व व फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे फक्त प्रिस्क्रिप्शन लिहून देतात पण रोग्याची संपूर्ण काळजी फार्मासिस्ट घेत असतात फार्मासिस्ट हे औषधांचा शोध लावून रोगांना योग्य तो उपचार करून देतात. आणि मेडिकल सारखे स्वयंरोजगार सुद्धा हे फार्मासिस्ट करू शकतात. डी फार्मसी च्या प्राचार्य योगिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला व अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी प्रा सुरेश वाघ , प्रा प्रीती गायकवाड, इंजिनियर साहिल मगरे इंजिनीयर सौरव मगरे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीती गायकवाड यांनी मानले.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन