www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 20 डिसेंबर 2025
वैजापूर : दि. 20/12/2025 (शनिवार) रोजी विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे कै. विनायकराव पाटील स्मृतिपित्यर्थ आयोजित विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात न्यू हायस्कूल गदाना येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
सांघिक खेळात खो-खो (मुली) व रस्सीखेच (मुली) या दोन्ही स्पर्धांत न्यू हायस्कूल गदाना संघाने प्रथम क्रमांक पटकावला. वैयक्तिक प्रकारात 100 मीटर धावणे (मुले) या स्पर्धेत चि. रुद्राक्ष संदीप अधाने यांनी प्रथम क्रमांक, तर लांब उडी (मुले) मध्ये चि. अजिंक्य प्रशांत पंडित यांनी प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडी (मुली) या प्रकारात कु. जयश्री राजेंद्र होळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेने सांघिक ढाल देखील पटकावली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. पवार सर, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पूर्णाताई अधाने, सर्व शालेय समिती सदस्य, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघ, खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक श्री. चव्हाण सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन