April 19, 2026

खुलताबाद येथे मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न; निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

📅 दिनांक : 03 फेब्रुवारी 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने

खुलताबाद: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘मतमोजणी’ संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), खुलताबाद येथे आज यशस्वीरित्या पार पडले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण सत्रात तालुक्यातील नियुक्त मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात खालील मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
ईव्हीएम (EVM) मतमोजणीच्या बाबतीत कंट्रोल युनिटमधील मते कशी पाहायची आणि त्यांचा तक्ता कसा तयार करायचा, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले,
वैधानिक कागदपत्रामधील फॉर्म १७-सी मधील मतांची जुळणी आणि निकालाचा अंतिम तक्ता तयार करणे,
पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून मतमोजणी केंद्रावर पाळावयाची शिस्त, गोपनीयता आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रक्रिया कशी पार पाडावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले.तसेच मतमोजणी ही अत्यंत संवेदनशील प्रक्रिया असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने त्रुटीरहित काम करणे अपेक्षित आहे, तसेच गोपनीयतेची शपथ बाबतीत ही त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष गुट्टे यांनी साहित्य वाटप व स्विकृतीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी व मतदान नोंद वही या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणानंतर सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मतमोजणीच्या विविध शंकांचे निरसन करून घेतले. या प्रशिक्षणामुळे खुलताबाद तालुक्यातील निवडणूक प्रशासन आता प्रत्यक्ष मतमोजणीसाठी सज्ज झाले आहे.