www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 06 डिसेंबर 2025
खुलताबाद (प्रतिनिधी) —
खुलताबाद तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. परिसरात “जय भीम” घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.
या कार्यक्रमास बौद्ध समाज आणि विविध पक्ष संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रमुख उपस्थितींमध्ये —
बौद्ध पौर्णिमा उत्सव समितीचे अध्यक्ष कारभारी ढवळे,
पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश अंभोरे,
रिपाई तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव,
पँथर्स तालुकाध्यक्ष राजअनंत सुरतकर,
अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तालुकाध्यक्ष शंकर अंभोरे,
राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष केशवराव वाघ,
रिपाई शहर अध्यक्ष अण्णा जाधव,
रिपाई शहर उपाध्यक्ष मिलिंद जाधव,
रिपाई सहसल्लागार गजानन वाकळे,
रिपाई वेरूळ सर्कल प्रमुख मधुकर गायकवाड,
बोरगाव सर्कल प्रमुख वाल्मीक ढिवर,
पळसगाव माजी सरपंच अशोक मोकळे,
तसेच योगेश साबळे, काशिनाथ तुपे, अशोक तुपे, भानुदास जाधव, सुधाकर बनकर, गणपत बनकर, वाल्मीक भालेराव, कैलास बनकर, राजाराम घुसाळे आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण, सामाजिक समतेचा संदेश आणि बौद्ध मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस