“आमदार प्रशांत बंब विरोधात आप युवा जिल्हाध्यक्ष सतीश लोखंडे यांचा एल्गार”
खुलताबाद दि. २५ ऑगस्ट २०२३
गंगापूर-खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब येत्या पाच सप्टेंबर शिक्षक दिनी जिल्हा परिषद कार्यालयावर. जिल्ह्यातील शिक्षकांविरोधात मोर्चा काढणार आहे. तर आमदार विरोधात आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश लोखंडे यांनी आमदार प्रशांत बंब यांना खडे बोल सुनावले.
यावेळी सतीश लोखंडे म्हणाले की आमदार प्रशांत बंब हे जनतेची दिशाभूल करून शिक्षकांना नाहक त्रास देत आहे. शिक्षक एक प्रामाणिक पेशा आहे. मात्र शासन शिक्षकांवर अनावश्यक कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे शिक्षक अगोदरच मेटा कुटीला आले असल्याने ते अध्यापनाचे कार्य व्यवस्थित रित्या पार पाडू शकत नसल्याने शिक्षकांवर असलेली अतिरिक्त कामाची जबाबदारी काढून टाकण्यात यावी. शालेय पोषण आहार,निवडणुकीचे कामे,जनगणना सर्वे, आणि इतर सर्वेची कामे काढून टाकण्यात आली तर शिक्षक निकोप आणि आनंदाने विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. आमदार बंब यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांवर बोलण्यापेक्षा त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यापेक्षा आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या दिल्ली आणि पंजाबच्या धरतीवर शिक्षकांना सर्व सेवा सुविधा युक्त अशा शाळा उपलब्ध करून द्याव्यात, प्रशिक्षण द्यावे,विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक बाबींचा अवलंब करून शिक्षकांवर विश्वास दाखवावा तरच आमदार प्रशांत बंब यांना बोलण्याचा अधिकार आहे असे श्री सतीश देवेंद्र लोखंडे म्हणाले.
More Stories
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून देवयानी पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल