दि. १६ ऑगस्ट २०२३
काल स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर मतदार संघातील गवळीशिवरा येथे १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर टोमॅटो खरेदी विक्री व्यवहाराचा शुभारंभ झाला.
यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रथम लिलाव झालेल्या शेतकऱ्याच्या टोमॅटोला प्रती क्रेट तब्बल ५१०० रुपये भाव मिळाला.
सरासरी ९०० ते १५०० रुपये क्रेट भाव यावेळी शेतकऱ्यांना मिळाला. १ महिन्यानंतर येणाऱ्या सर्व अडी अडचणी चा आढावा घेवून कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशन मार्फत उपबाजार सुरु करण्याच्या दृष्टीने सर्वानुमते पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
आमदार प्रशांत बंब यांनी केली टोमॅटोची बोली पहा काय घडलं.!
पहा संपूर्ण व्हिडीओ..!
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस