www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 01 फेब्रुवारी 2026
प्रतिनिधी : अशोक अधाने
महेशमाळ (ता. खुलताबाद) :
पौर्णिमा दिनाचे औचित्य साधत महेशमाळ येथील प्रसिद्ध गिरिजा देवी मातेच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच परिसरात भक्तांची वर्दळ वाढली असून “जय गिरिजा माता”च्या जयघोषाने संपूर्ण महेशमाळ दुमदुमून गेले होते.

मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महेशमाळला निसर्गसौंदर्याची खास ओळख आहे. डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांसह भाविकांचेही श्रद्धास्थान आहे. पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देवीचे विधिवत पूजन करून नवस फेडले.
महेशमाळचे पूर्वीचे नाव महेशमाळ असून सध्या हे ठिकाण म्हैसमाळ या नावानेही ओळखले जाते. थंड व आल्हाददायक वातावरणामुळे पौर्णिमा व इतर सण-उत्सवाच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक भेट देत असतात.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दिवसभर भाविकांची ये-जा सुरू असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश