February 8, 2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश

www.themaharashtratoday.com

मोबाईल नं. 9623871987

📅 दिनांक : 03 फेब्रुवारी 2026

प्रतिनिधी : अशोक अधाने

खुलताबाद : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद तालुक्याचा दौरा करून निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणुका पारदर्शक, निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय, खुलताबाद येथे निवडणूक शाखेची पाहणी केली. यावेळी त्यांनी खालील बाबींवर विशेष भर दिला:
१. मतदार याद्यांच्या बाबतीत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. नाव नोंदणीपासून एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
२. मतदान केंद्रांवरील सुविधा बाबतीत सुचना देऊन तालुक्यातील मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (Assured Minimum Facilities) जसे की रॅम्प, पिण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छतागृहे यांची उपलब्धता प्रत्यक्ष तपासून अहवाल सादर करण्यास सांगितले.
३. संवेदनशील केंद्रांवर लक्ष देऊन तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन तेथे अतिरिक्त बंदोबस्त आणि सीसीटीव्ही देखरेख ठेवण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
४. भरारी पथके व आचारसंहिता कक्षाने आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी भरारी पथके (Flying Squads) आणि स्थिर संनियंत्रण पथकांनी (SST) आतापासूनच सतर्क राहून काम करावे, असे त्यांनी बजावले.
तसेच कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भेट देऊन *स्ट्रांग रुम, साहित्य कक्ष, संगणक कक्षाची* पाहणी केली.
या आढावा बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष गुट्टे , श्री . प्रकाश नाईक आणि निवडणूक निर्णय प्रक्रियेतील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
“निवडणूक कार्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी चोख पार पाडावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी यावेळी केले.