www.themaharashtratoday.com
मोबाईल नं. 9623871987
दिनांक : 08 फेब्रुवारी 2026
प्रतिनिधी : अशोक अधाने
——————————————
खुलताबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर, आता प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील उमेदवारांचे भवितव्य उद्या दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ निश्चित होणार आहे.
मतमोजणीचे प्रमुख तपशील:
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खुलताबाद येथे अधिकृत केंद्रावर सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.या मतमोजणी प्रक्रियेसाठी ९ रो अधिकारी सहित १५ मतदान पर्यवेक्षक व त्यांना १२ मतमोजणी सहाय्यक ,१९शिपाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी ६ मतदान पर्यवेक्षक, २१ मतमोजणी सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच एक्सेल टॅब्युलेशन, ईव्हीएम सिलिंग, ओळखपत्र वितरण आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करणे व हजेरी घेणे यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तसेच मतमोजणीच्या ठिकाणी कोणीही स्मार्ट वॉच, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगु नये व नियुक्त केलेली पथकाकडे जमा करण्यात यावे. मोबाईल स्वतः जवळ बाळगल्यास उक्त नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम (EVM) मशीनद्वारे राबवण्यात आली असून मतमोजणी देखील तांत्रिक नियमानुसार पार पडेल. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ती फेरीनिहाय (Round-wise), गटनिहाय (ZP Group), गणनिहाय (PS Block) आणि टेबल निहाय आयोजित करण्यात आली आहे. एकाच वेळी अनेक गटांची मोजणी व्हावी याकरिता स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर नियुक्त मतमोजणी कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक (Micro Observers) उपस्थित राहतील.
प्रत्येक फेरीनंतरचे अधिकृत निकाल आणि आघाडीची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि निवडणूक विभागाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.
सुरक्षा आणि नियमच्या बाबतीत
मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. उमेदवारांच्या प्रतिनिधींना (Counting Agents) मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी टेबलजवळ बसण्याची परवानगी असेल.
नागरिकांनी निकालाची माहिती घेताना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष गुट्टे यांनी केले आहे.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन