April 13, 2026

गदाना येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा

www.themaharashtratoday.com

गदाना प्रतिनिधी | अशोक अधाने | दि. १५ ऑगस्ट २०२५

गदाना गावात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्रीमती सविता पोपट चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना व न्यू हायस्कूल गदाना येथे स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सदर केले सोबत अंगणवाडी क्रमांक १ व २ मधील लहानग्यांनी देशभक्तीपर गीते व विविध सादरीकरणे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

न्यू हायस्कूल गदाना येथे विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते तसेच भाषणे सादर केली. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सादर केलेली उत्कृष्ट भाषणे विशेष आकर्षण ठरली. मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-शिक्षिका यांच्यासह गावातील नागरिक, तरुण व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांची जोशपूर्ण गीते व भावपूर्ण भाषणे यामुळे संपूर्ण गावात 15 ऑगस्टचा उत्सव देशभक्तीच्या वातावरणात अविस्मरणीय ठरला.