November 12, 2025

आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत देवनाळा खु.व बु. येथे अनेक नागरिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

मंगळवार दि.२२ ऑगस्ट २०२३

मा आमदार श्री.प्रशांतजी बंब साहेब व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवनाळा खु.व देवळाना बु. येथे अनेक नागरिकानी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश.

https://youtu.be/2VIDihektNA

आज देवनाळा खु.व देवनाळा बु. या ठिकाणी आमदार प्रशांतजी बंब साहेब यानी गावातील नागरिकाच्या उपस्थित गावातील नागरिकाशी संवाद साधुन विविध विकास कामे , विविध समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन करण्यात आले , आमदार प्रशांतजी बंब साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकडो नागरिकानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, प्रवेश केलेल्या सर्व गावातील नागरिकाचे आमदार प्रशांतजी बंब यानी अभिनंदन केले. या कार्यक्रमात कामगार कल्याण योजनेंतर्गत 99 लाभधारकाना सुरक्षा संच देण्यात आले. जि.प पा.शाळेत जाऊन विद्यार्थ्याची गुणवत्तेबाबत शिक्षकाशी चर्चा करून गुणवत्ता चांगल्या दर्जेदार करण्याच्या सुचना शिक्षकांना दिल्या. दलित वस्तीत जाऊन परमपूज्य भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तेथील वस्तीवरील नागरिक महिला व पुरुष याच्या सोबत विकास कामे, व वस्तीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे,सरपंच नईम शेख, जि.प उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड,माजी सभापती गणेश नाना अधाने, उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश चव्हाण , ज्ञानेश्वर नलावडे, प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक परसराम बारगळ, आशिष कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, राहुल निकुंभ, आमदार साहेबाचे स्विय सहाय्यक रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, राहुल चव्हाण, सुमित चाबुकस्वार, शिवनाथ गायके,प्रशांत गदानकर, अमोल गवळी,सतिश खंडागळे, संतोष घुसिंगे, युसूफ पठाण,अविनाश वेताळ, बंडु शिंदे, आजिनाथ जाधव, सुरेश जाधव,आनंदा काटकर, विनोद कामठे, आदी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ मालोदे , पाशु पठाण,संजय साळुंके, गोरक साळुंके,संजय शिंदे, अंकुश साळुंके,चांद शेख, सुभाष मोरे, संतोष मोरे,शेकनाथ गायकवाड, दत्ता मालोदे,सोनु बनकर, अलीम शेख,कडुबा काळे, सुभाष काळे,मुजीब शेख,विशाल मोरे, पुंडलिक पांडव, शेकनाथ गायकवाड, सुरेश साळुंके,चंद्रकांत साळुंके, दिपक मोरे,लक्ष्मण पांडव, बाबासाहेब मालोदे,शाकिर पटेल, दत्ता अधाने,गणेश घोडके, योगेश अधाने, पवन चव्हाण, बबलु घोडके,जाकिर पटेल, राहुल कोरडे, सचिन साळुंके, सचिन लकडे,सलीम पटेल, जावेद पटेल,गणेश चव्हाण, संदिप गायकवाड,मुसा सय्यद, कय्युम पटेल,अस्लम शेख, संकेत कोरडे अनेक नागरिकानी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. उपस्थित सर्व पदाधिकारी व पक्षप्रवेश केलेल्या नागरिकाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांनी आभार व्यक्त केले.