कमलनयन अण्णा वाघ अध्यक्षपदी, तर अर्चना अशोक अधाने उपाध्यक्षपदी; शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी नव्या समितीची जबाबदारी
गदाना | प्रतिनिधी : अशोक अधाने मो.9623871987
गदाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचा सहभाग वाढविणे तसेच शाळेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने समितीची निवड प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेत कमलनयन अण्णा वाघ यांची अध्यक्षपदी, तर सौ. अर्चना अशोक अधाने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवीन समितीत पालक व ग्रामस्थांचा सहभाग
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी राजू सांडू बिरसाने, आजिनाथ रामराव तुपे, जनार्दन सोमीनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज कुकलारे, किरण दगडू गायकवाड, ज्ञानेश्वर श्रीराम जगताप आणि जितेंद्र रतन जाधव यांची निवड करण्यात आली.
शिक्षणप्रेमी प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब रुस्तुम खाडे यांची निवड झाली.
महिला सदस्य म्हणून सौ. रेखा जितेंद्र जाधव, सौ. पूजा नंदकुमार खाडे, सौ. आरती भगवान दिशवरे, सौ. सविता दत्तू चव्हाण आणि सौ. सरला पोपट चव्हाण यांचा समितीत समावेश करण्यात आला.
शाळा प्रशासनाची जबाबदारी
मुख्याध्यापक तथा समिती सचिव : श्रीमती हिवराळे सी. आर.
शिक्षक प्रतिनिधी : श्रीमती वाघ व्ही. एस.
विद्यार्थी प्रतिनिधी : प्रज्ञा पंकज वाहूळ व दुर्गेश दादाराव चव्हाण
नवीन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळेच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने निवड प्रक्रिया
शालेय व्यवस्थापन समितीच्या गठनप्रसंगी शिक्षिका लतिका बोर्डे, परविन सय्यद, आस्मा शेख, शारदा गायकवाड, जयश्री गवळे, रेणुका पिसे तसेच शिक्षक पंढरी तायडे, फिरोज पठाण, साईनाथ चव्हाण आणि अमोल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी माजी अध्यक्ष संजय दिगंबर चव्हाण, सरपंच पती रामहरी तुपे, सदस्य काकासाहेब अधाने, जनार्दन वाहूळ, उपसरपंच पती दत्तू चव्हाण, वैजनाथ अधाने, गणेश चव्हाण, कचरू वाघ, पांडुरंग वाघ, लक्ष्मण चव्हाण, संतोष अधाने, साहेबराव चव्हाण,भागुबाई वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच पत्रकार अशोक अधाने आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण अधाने यांचीही उपस्थिती होती.
नवीन शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासकामांना गती मिळून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
More Stories
गदाणा जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!
श्रावण महिन्यात भेंडाळा मारुती मंदिरात प्रत्येक शनिवारी कीर्तन महोत्सव