दि.१३ मे २०२४
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मतदान करण्यासाठीची मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी धडपड ग्रामीण भागात दिसून आली. मतदान करण्यासाठी नागरिकांनी सकाळी गर्दी असेल असे ग्राह्य धरले परंतु काही ठिकाणी दुपारी तापलेल्या उन्हामध्येही मतदानासाठी मतदारांची होती.
खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी असून आली.
एकूण आकडेवारीनुसार गदाना येथे ६५% मतदान झाले, बूथ क्र.73 वर 1406 पैकी 920 तर बूथ क्र. ७४ वर 10 37 पैकी 658 मतदान झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्याचे मतदान एकूण 54.02 एव्हडे झाले.

मागील निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात 2019 मध्ये 63.41% मतदान झाले. AIMIM उमेदवार इम्तियाज जलील सय्यद यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 4,492 मतांच्या फरकाने विजय मिळवला, 3,89,042 मते मिळवली. इम्तियाज जलील सय्यद यांनी एसएचएसच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला, त्यांना 3,84,550 मते मिळाली. परंतु 2024 मध्ये मराठा आरक्षण, वंचित आघाडी ,मुस्लीम वोट बँक व विविध विकासकामांच्या मुद्यांच्या आधारे निवडणुकीच्या निकालाचे चिन्ह काय असेल ते जनताच ठरवणार याची उत्सुकता आहे.
More Stories
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्याची मतमोजणी प्रक्रिया व तयारी बाबत.
📰 ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आढावा; निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश