April 21, 2026

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 2024 श्रीक्षेत्र वेरूळ येथे संपन्न झाला

 

भोसले घराण्याचे मूळ असलेले मालोजीराजे भोसले गडी येते ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्षे झाल्या निमित्त सामूहिक राज्याभिषेक मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला न्याय,नीती,संस्कार पराक्रम आणि स्वराष्ट्र हित स्वाभिमान प्रत्येकाच्या मनामनात रुजवून अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी मन आणि मनगट बळकट करून अन्यायाविरुद्ध लढणारे मावळे शिव छत्रपतींनी तयार केले आणि तुम्हा आम्हाला सदरील संस्कार दिले अन्यायाविरुद्ध लढणारी पराक्रमी सुपीक भूमी या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी निर्माण केली आणि परकीय आक्रमणाच्या विरुद्ध जन कल्याणकारी जनतेच परोपकारी राज्य स्थापित केलं आणि 350 वर्षांपूर्वी तुमच आमच सर्वांच आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला जगाला एक युगप्रवर्तक राजा मिळाला या जागतिक घटनेला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहे या सुवर्ण सुमंगलदिनी 350 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात जगभर साजरा होत असताना आपणही वेरूळ येथील पवित्र भूमी मध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज आणि स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र वेरूळ भूमीमध्ये शहाजीराजे स्मारक मालोजीराजे भोसले गढी येथे 350 वा शिवराज्याभिषेक दिन अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते सामूहिक शिव अभिषकाने संपन्न केला.


भारतभर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा अनेक ठिकाणी संपन्न होत असताना मुख्य सोहळा किल्ले रायगड येथे प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो याही वर्षी दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने भोसले घराण्याचं उगमस्थान असलेलं वेरूळ येथील पवित्र ठिकाण म्हणजे मालोजीराजे भोसले गढी यावर्षी 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा स्वराज्याच स्फुस्लिंग पेटवणाऱ्या पवित्र वेरूळ गढीतून आपण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न केला
श्रीक्षेत्र वेरूळ येथे संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
1)शिवछत्रपतींच्या 125 मूर्ती अभिषेकासाठी होत्या 2)विविध क्षेत्रातील 125 मान्यवर जोडप्यांच्या हस्ते शिव आभिषेक संपन्न झाला 3)अभिषेकासाठी सप्त नद्यांचे जल उपलब्ध केले होते गंगा, यमुना ,सरस्वती, कावेरी, कृष्णा, गोदावरी ,नर्मदा, इत्यादी 4)समुद्र जल 5)दूध, दही , तूप, मध, साखार,सुवर्णजल, चांदी जल, फळ , रत्नजल, गदोधक जल , औषधी जल, उष्णोधक जल, अमरस, भस्म स्नान , इत्यादी 6) ब्रह्म वृंदांच्या मंत्रघोषात सामूहिक शिव छत्रपतींना अभिषेक मोठ्या उत्साहात 125 मान्यवर शिवभक्तांच्या हस्ते संपन्न झाला पूजेसाठी असलेली मूर्ती ही प्रत्येक शिवभक्ताला पूजेसाठी भेट म्हणून देण्यात आली.
सोहळा संपन्न होत असताना डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा प्रसंग यावेळी शिवभक्तांना अनुभवयास मिळाला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराजांचे भव्य दिव्य स्मारकाच्या समोर मुख्य मंचावर छत्रपती शिवरायांची मनमोहक मूर्ती होती मुख्य मूर्तीला यजमान आयोजक राजेंद्रजी पवार व त्यांच्या पत्नी स्वाती पवार तसेच कारभारी औताडे पाटील आणि सौ लताबाई औताडे यांच्या हस्ते अभिषक झाला तचेच मुख्यमंचाच्या समोर आध्यात्मिक, राजकीय ,वैद्यकीय , सामाजिक तथा शेतकरी बांधव आणि कृषी तज्ञ अशा विविध क्षेत्रातील 125 मान्यवर शिवभक्तांचे जोडपे अभिषेकासाठी समोर यजमान म्हणून बसलेले होते या महा अभिषेकाचे मुख्य पोरोहित्य अमोल गुरु तथा दिपक गुरू शुक्ल सहित अनेक सहकारी ब्रह्मवृंद यांच्या मंत्र उच्चारात हा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चा अभिषेक सोहळा संपन्न झाला हा सोहळा संपन्न करण्यासाठी आयोजक राजेंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर गावडे सर ,महेश निऱ्हाळी ,राजु चव्हाण ,भिकन अल्लाड जनार्दन रिठे ,जगन्नाथ मामा काळे, सोष्ठे पाटील, गणपतराव म्हस्के यांनी परिश्रम घेतले सोहळा संपन्न झाल्यानंतर अनेक शिवभक्तांनी प्रतिक्रिया देतानी आपला अनुभव व्यक्त केला की या पवित्र पावन भूमीमध्ये आल्यानंतर आमच्या अंगाला शहारे आले आणि या ठिकाणी जो अभिषेक सोहळा झाला या अगोदर आम्ही असा सोहळा बघितला नाही अनुभवला नाही हा अविस्मरणीय क्षण आमच्या जीवनात आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने आला आम्ही आमचे भाग्य समजतो आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल आयोजक राजेंद्रजी पवार यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो अशा सोहळ्याला आम्ही आवर्जून पुन्हा पुन्हा येणार अशी भावना पूजेला बसलेल्या मान्यवर शिवभक्तांनी व्यक्त केली.
श्री जणेश्वर महाराज आणि अक्का महाराज व वेरूळ गावचे सरपंच प्रकाश पाटील मिसाळ यांची उपस्थिती होती सर्व मान्यवर शिवभक्तांचे आभार व्यक्त करताना राजेंद्र पवार पुढे म्हणाले की आठरापगड जातीला सोबत घेऊन न्याय नीती पराक्रमाचे संस्कार देणारी ही भूमी आहे सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाण्याचे संस्कार ही भूमी देत राहील करण्यासाठी या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा याचा निर्णय शासन स्तरावर राज्यकर्त्यांनी घ्यावा व शिवभक्तांनीही त्याचा पाठपुरावा करावा अशी इच्छा आयोजक राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली व यापुढेही आपण या गढीवरील कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही विनंती शिवभक्तांना केली.