November 10, 2025

भडजी येथील मकरंद वाकळे यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), दिल्ली येथे निवड – गावात आनंदाचे वातावरण

🖋️ प्रतिनिधी : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

भडजी : 📍 दिनांक: 16 जुलै 2025

 

भडजी, ता. खुलताबाद – ग्रामीण भागातील एक उभरता कलावंत मकरंद भाऊसाहेब वाकळे यांची देशातील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली येथे निवड झाल्याची अभिमानास्पद बाब नुकतीच समोर आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण भडजी गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीचे औचित्य साधून दिनांक १४ जुलै २०२५ रोजी मौजे भडजी येथे मकरंद वाकळे यांचा भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच बाबासाहेब वाकळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी सरपंच बद्री नाना वाकळे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शेळके सर, रत्नाकर वाकळे, आप्पाराव वाकळे, वाल्मीक वाकळे, तसेच गदाना येथील पं.स. उपसभापती प्रकाश चव्हाण व राजू चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गौरव केला.

मकरंद यांचे वडील भाऊसाहेब गुरुजी हे शिक्षक असून आई चंद्रकला वाकळे या गृहिणी आहेत. एक सर्वसामान्य शिक्षक कुटुंबातील मुलगा राष्ट्रीय नाट्य शाळेसारख्या संस्थेत निवडला जाणे हे संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांची ही निवड मेहनत, सातत्य आणि जिद्दीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मकरंदच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ग्रामीण भागातील युवकाला जर योग्य दिशा, संधी आणि पाठबळ मिळाले तर ते राष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.”

कार्यक्रमात त्यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. एक शिक्षक पालक व संस्कारक्षम घरातून आलेल्या मकरंद वाकळे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि शिस्तशीर अभ्यासाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

भविष्यातील अभिनय क्षेत्रात त्यांनी अधिक यश मिळवावे व मराठवाड्यासह महाराष्ट्राचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

 

अशोक पाटील अधाने
प्रतिनिधी – द महाराष्ट्र टुडे न्यूज
www.themaharashtratoday.com

9623871987