www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि. 07 नोव्हेंबर 2025
खुलताबाद (प्रतिनिधी):
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महिला आघाडीच्या खुलताबाद तालुकाध्यक्षपदी सुलतानपूर येथील प्रतिष्ठित शिक्षिका दीप्ती सतीश शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा नियुक्ती समारंभ तालुकाप्रमुख राजू रंगनाथ वरकड यांच्या हस्ते बुधवारी पार पडला.
नव्या जबाबदारीचा स्वीकार करताना दीप्ती शुक्ला यांनी महिला कार्यकर्त्यांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “महिलांचा सशक्त सहभाग हाच पक्षाच्या ताकदीचा आधार आहे, आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
या प्रसंगी गणेश अधाने, विष्णू फुलारे, अविराज निकम, दत्ता मालोदे, आकाश हिवरडे, नानासाहेब चव्हाण, किशोर काळे, मुकेश मालोदे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी शुक्ला यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व्यक्त करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!
🟢 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० — शुभारंभ आणि DBT पोर्टल सुरू!