www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
खुलताबाद – सराई
दि. 28 ऑक्टोबर 2025
वेरूळ (ता. खुलताबाद) – आज मंगळवार, सकाळी साडेअकरा वाजता वेरूळ येथील महावितरणच्या स्थानिक कार्यालयात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी स्थानिक नागरिक, हॉटेल व्यवसायिक, रेस्टॉरंट चालक, दुकानदार, लॉजिंग धारक, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी खान यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी पाच दिवसांत वीजपुरवठा स्थिर व सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
तसेच शुक्रवारी मेंटेनन्स न करता मंगळवारी मेंटेनन्सचे नियोजन करण्यात येईल, गणपती मंदिर परिसरातील डीपीची क्षमता वाढवली जाईल, आणि वारंवार उडणाऱ्या फ्युजच्या ठिकाणी उच्च दर्जाचे, जास्त क्षमतेचे फ्युज बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग चालक, दुकानदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹 मुख्य मुद्दे:
1️⃣ वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरुद्ध नागरिकांची महावितरणकडे धडक.
2️⃣ पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन.
3️⃣ डीपीची क्षमता वाढवणे व उच्च दर्जाचे फ्युज बसवण्याचा निर्णय.
4️⃣ स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!