दिनांक : 21 ऑक्टोबर २०२३
खुलताबाद : विभागीय स्तर मैदानी स्पर्धेत राजीव गांधी कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय घोडेगाव, मधील रेहान अनिस बेग या विद्यार्थ्यांने 17 वयोगट मधून 100 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. व तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप सर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री जाधव टी. एल. सर, प्राचार्य, शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस