April 23, 2026

भारताचे माजी राष्ट्रपती, “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व वाचन प्रेरणा दिन साजरा

 

दि.16/10/2023 रोजी राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय घोडेगाव, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती, “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या हस्ते डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सर, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते.
वाचन प्रेरणा दिन निमित्त सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदिप जाधव सर,प्राचार्य डाॅ. डी.डी घुगेसर,प्रा.तुकाराम जाधव सर, प्राध्यापिका ठाकूर मॅडम, प्रा.नलावडे सर, प्रा.अशोक फुलारे सर प्रा. अमोल जाधव सर, हारदे सर, सोनवणे सर हे उपस्थिती होते.