November 16, 2025

भाजपचे संदीप निकम व कल्याण नलावडे यांचा सराई गावामध्ये जनसंवाद दौरा

www.themaharashtratoday.com

 प्रतिनिधी : अशोक अधाने

मोबाईल नं. 9623871987

खुलताबाद – सराई

(दि. 24 ऑक्टोबर 2025)

 

 

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुक्यातील सराई येथे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते तथा आमदार प्रशांत बंब यांचे निकटवर्तीय संदीप निकम यांच्या नेतृत्वाखाली संवाद दौरा पार पडला.

या दौऱ्यात भाजपचे युवा नेते कल्याण नलावडे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीतील नियोजन, विकास आराखडे व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

 

गावातील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीज वितरण, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, शेती व सिंचन व्यवस्था, महिला बचतगटांचे सबलीकरण, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती या विषयांवर स्थानिक नागरिकांनी मते मांडली. त्यावर संदीप निकम यांनी आश्वासन दिले की, “आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद तालुक्यातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामपातळीवरील समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य आहे.”

“भाजप सरकारने गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात अनेक योजनांची अंमलबजावणी केली असून, जनतेपर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते घराघरात जात आहेत.” कल्याण नलावडे (भा.ज.पा. )

या संवाद दौऱ्यात सराईसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य, शेतकरी, तरुण, आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहात केले असून संदीप निकम यांच्या संवाद दौऱ्यामुळे गावात निवडणुकीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी उपस्थित नेत्यांचे स्वागत करून त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपच्या विकासदृष्टी आणि जनसंपर्क मोहिमेला या दौऱ्यामुळे नवी उभारी मिळाल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. यावेळी एल.जी.गायकवाड,ज्ञानेश्वर नलावडे,अजिनाथ जाधव,सुरेश जाधव इ.उपस्थित होते