छत्रपती संभाजीनगर : दिनांक 23 सप्टेंबर 2023
प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी परतीचा पाऊस परत आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण झाल्याचे दिसून येत आहे
ठिकठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिके हातातून गेली असली तरी आता पिण्याच्या पाण्यासाठी साठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पावसाचा अंदाज घेता सध्या पाणी अभावी पिके करपली गेली होती परंतु सध्या हातात असलेले पीक बाजरी तूर कपाशी मका सोयाबीन या पिकांची सध्या पाणी अभावी खूपच नुकसान झालेले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळच असलेल्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या व देवी गिरीजा माता देवस्थान हिकाणी जाण्यासाठी रस्त्याची अचानक झाल्लेल्ल्या पावसामुळे दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली परंतु आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस