November 22, 2025

देवळांना खुर्द येथील स्मशानभूमीचे काम पूर्ण – ग्रामस्थांकडून आमदार बंब यांचे आभार

www.themaharashtratoday.com

प्रतिनिधी : अशोक अधाने

मोबाईल नं. 9623871987

दि.२४ ऑगस्ट २०२५  खुलताबाद तालुक्यातील देवळांना खुर्द येथील स्मशानभूमीचे नवे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामासाठी ग्रामस्थांकडून वारंवार आमदार, खासदार व मंत्री यांना निवेदने आणि प्रस्ताव देण्यात आले होते. अखेर आमदार प्रशांत बंब यांच्या निधीतून हे काम मार्गी लागले.

गावातील नागरिकांनी या उपक्रमामुळे गावाच्या महत्त्वाच्या सोयीसुविधेत भर पडल्याचे सांगत आमदार प्रशांत बंब तसेच स्थानिक प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.