November 16, 2025

जय हनुमान भजनी मंडळ टाकळी कदिम यांचा जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

www.themaharashtratoday.com

प्रतिनिधी : अशोक अधाने

छत्रपती संभाजी नगर: दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५

छत्रपती संभाजीनगर येथील मयूर पार्क येथे आयोजित हरसिद्धी रास दांडिया भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत टाकळी कदिम येथील जय हनुमान भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.

दिनांक 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत ही भजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 60 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत जय हनुमान भजनी मंडळ टाकळी कदिम यांनी सहभाग घेऊन आपले भजन सादर केले. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे परीक्षण ह.भ.प. उत्तमरावजी बडे साहेबसुनील महाराज आधाने यांनी निरपेक्ष व पारदर्शक पद्धतीने केले. त्यांच्या परीक्षणात टाकळी कदिम भजनी मंडळाच्या सादरीकरणाने उच्चांक गाठत द्वितीय क्रमांक मिळविला.

या मंडळातील मुख्य संघप्रमुख व गायन ह.भ.प. कृष्णा महाराज पुरेविकास महाराज गवारे यांनी केले. मृदंगावर ऋषिकेश पुरे यांनी सुंदर साथ दिली.
प्रमुख वीणेकरी रामचंद्र बडेकर, सहगायनात डॉ. सुनील म. पोपळघट, सुरेश जोजारे, कारभारी म. जाधव, चांगदेव मोहरे, कचरू चंदेल, अमोल भवर यांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब अवताडे पाटील, अभिजीत भैय्या देशमुख व पैठण पगारे सर यांच्या हस्ते मंडळातील कलाकारांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत जय हनुमान भजनी मंडळाच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सर्वत्र कृष्णा महाराज पुरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.