www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
छत्रपती संभाजी नगर: दिनांक २० ऑक्टोबर २०२५
गोळेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने गोळेगाव परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त गिफ्ट वाटप कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात नितीन धुमाळ, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), यांच्या हस्ते तसेच तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, स्थानिक कार्यकर्ते बबन बाळाभाऊ औटे, देविदास औटे यांच्या उपस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना दिवाळी उपहार संच व कपडे देण्यात आले.
पूराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये लाभार्थी म्हणून मंजुबाई शंख, सुभाष शंख, दिगंबर संघ, रामकृष्ण संक, राजेंद्र शंख, अनिल संक, हरिदास शंख, गणेश शंख, काशिनाथ संघ, नेमिनाथ संघ, बबन साहेबराव औटे, अशोक आवटे, सागर आवटे, उत्तम त्रिभुवन, अंबादास आवटे, मनोज शंख, जीवन आवटे, कांताराम चव्हाण, मी टू आवटे इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश होता.
या उपक्रमाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे दिवाळीच्या आनंदात पूरग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत, अशा सामाजिक कार्यातून जनतेच्या मदतीला सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!