June 11, 2025

२८ ते २९ दिवस झाले पिकांना पाणी नाही पिकांनी माना टाकल्या; खुलताबाद तालुका दुष्काळी जाहीर करावा; महाविकास आघाडी

Khultabad Tahasil Office

दि.२४ ऑगस्ट २०२३

महाविकास आघाडी आंदोलन इशारा..!

२८ ते २९ दिवस झाले पिकांना पाणी नाही पिकांनी माना टाकल्या; पिके सुकून गेले शेतकऱ्यांचा जो खर्च होण्याचा होता तो होऊन गेला त्यामुळे आज पाऊस पडलाही तरी शेतकऱ्यांच्या हातात पिक हाती लागणार नाही; म्हणून खुलताबाद तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच अतिवृष्टी चे पैसे खुलताबाद तालुक्याला ,मिळाले नाही ते तालुक्याला पूर्णपणे मिळाले पाहिजे..! मागच्या वर्षी ईतर तालुक्यांना पिक विमा मिळाला खुलताबाद तालुक्याला पिक विमा मिळाला नाही; तो मिळाला पाहिजे..! यावर्षी गंगापूर – खुलताबाद – वैजापूर – औरंगाबाद हे २५% दुष्काळात आले; आमचा खुलताबाद तालुका ५०% दुष्काळात जाहीर करावा..!