July 26, 2026

सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खुलताबाद तालुका अध्यक्षपदी निवड


खुलताबाद प्रतिनिधी | अशोक अधाने | दि. ०५ ऑगस्ट २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने खुलताबाद तालुक्याच्या अध्यक्षपदी सुरेश बापू जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने पार पडली. सुरेश जाधव हे तालुक्यातील युवा व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, त्यांनी आतापर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

निवडीनंतर बोलताना सुरेश बापू जाधव यांनी सांगितले की, “पक्षाच्या कार्यप्रणालीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कार्यकर्त्यांचा सन्मान राखत संघटनात्मक बळकटीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी निष्ठेने काम करीन.”

या निवडीबद्दल त्यांचे आमदार सतीश चव्हाण, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या नियुक्तीनंतर खुलताबाद तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You may have missed