www.themaharashtratoday.com
📍 गदाना (ता. खुलताबाद) | दिनांक – 3 ऑगस्ट 2025
प्रतिनिधी : अशोक अधाने
+91 9623871987
गदाना गावातील चार युवक-युवतींची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये विद्युत सहाय्यक या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल गावामध्ये सन्मान व अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सन्मानित युवक-युवतींची नावे पुढीलप्रमाणे – 👉 उज्ज्वला चव्हाण 👉 वर्षा ठेंगडे 👉 सुदर्शन अधाने 👉 त्रिकाल अधाने या सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ, फेटे, सत्कारमाला देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील नागरिक, महिला, युवकवर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या यशस्वी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक गंगाधर गायकवाड, तसेच सोशल ऑडिटर पंढरीनाथ मोकळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या निमित्ताने त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नवयुवकांना प्रेरणा दिली. या सोहळ्याचे आयोजन सर्व ग्रामस्थ गदाना व बोरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुबकपणे करण्यात आले असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद.” या विचारांनी प्रेरित होऊन या युवकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवल्याने सर्व ग्रामस्थांनी याचा अभिमान व्यक्त केला.
अशोक अधाने – प्रतिनिधी गदाना,
ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर
More Stories
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत वेरूळ येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!
🔥 अवकाळी पावसाने गंगापूर तालुक्यात हाहाकार; शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी 🔥
🔥 मोदी-फडणवीस सरकारची जनतेला मोठी भेट! ☀️