December 6, 2025

विभागीय स्तरावरील मैदानी स्पर्धेत राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

दिनांक : 21 ऑक्टोबर २०२३

खुलताबाद :  विभागीय स्तर मैदानी स्पर्धेत राजीव गांधी कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय घोडेगाव, मधील रेहान अनिस बेग या विद्यार्थ्यांने 17 वयोगट मधून 100 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. व तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप सर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री जाधव टी. एल. सर, प्राचार्य, शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.