November 7, 2025

युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांचा गौरव – रत्नपूर येथे शिवप्रेमींनी जल्लोषात साजरा केला अभिमानाचा क्षण

🖋️ वार्ताहर : अशोक अधाने

www.themaharastratoday.com

📍 दिनांक – १३ जुलै २०२५

रत्नपूर, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झाल्याने राज्यभरात शिवप्रेमींमध्ये अभिमान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही गौरवास्पद घटना केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या वैभवशाली इतिहासाचा जागतिक स्तरावर झालेला सन्मान मानला जात आहे.

या ऐतिहासिक यशाचा साक्षात्कार साजरा करण्यासाठी रत्नपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एकत्र येत शिवप्रेमींनी जल्लोष केला. या विशेष प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा. संजयभाऊ खंबायते व आमदार मा. प्रशांत बंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी शिवराज्याभिषेक, किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, व भविष्यातील संवर्धनाची गरज या विषयांवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर पुढीलप्रमाणे –
▪ जिल्हा उपाध्यक्ष – प्रकाश वाकळे
▪ तालुका अध्यक्ष – प्रकाश चव्हाण
▪ पंचायत समिती माजी उपसभापती – दिनेश अंभोरे
▪ शहराध्यक्ष – परसराम बारगळ
▪ माजी नगरसेवक – अविनाश कुलकर्णी
▪ तालुका सरचिटणीस – सतीश दांडेकर
▪ भाजप पदाधिकारी – मनोज पवार, प्रशांत गदांनकर, सोमीनाथ जाधव, दीपक फुलारे, गणेश सावजी, सोनू भावसार, भगवान बळी, काकासाहेब नागे, शरद आवारे, दादासाहेब बारगळ, शंकर काळे

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शिवप्रेमींनी दिलेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचा उद्देश शिवकालीन वारसा जोपासण्याची शपथ घेणे व आगामी पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावून देणे हा होता.