🖋️ वार्ताहर : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
📍 दिनांक – १३ जुलै २०२५
खुलताबाद – सध्या खरीप हंगामात पेरणी व लागवडीची कामे सुरू असून गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शेतकरी यामध्ये व्यस्त आहेत. मात्र, सध्यस्थितीत बाजारसमित्या, सुलतानपूर खरेदी-विक्री संघ, कृषी सेवा केंद्रे, लघुस्तर स्टोअर्स आदी ठिकाणी युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी वेळेवर खतांची खरेदी करून लागवड पूर्ण करावी यासाठी युरिया खताची सुलभ उपलब्धता अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव बंब यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे गंगापूर व खुलताबाद तालुक्यात युरिया खताचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
बाजारात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दलाल, व्यापारी यांचा गैरफायदा शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी भूमिका आमदार बंब यांनी घेतली आहे.
🖋️ वार्ताहर – अशोक अधाने
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस