June 13, 2026

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषद भिसेवाडी शाळेच्या लघुपटाची घेतली दखल

— रिपोर्टर : अशोक अधाने
मो. 9623871987
www.themaharashtratoday.com

 

वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी, केंद्र लासूरगावच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तयार केलेल्या “चांगला स्पर्श व वाईट स्पर्श” या लघुपटाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राज्यभरातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये हा लघुपट दाखवण्यात येत आहे.

याबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी भिसेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. विशेषतः शाळेचे मुख्याध्यापक फेरोज शेख आणि शिक्षक विजय मिट्टेवाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर उपस्थित होते.

मुंबई महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सांगितले की, “चांगला स्पर्श व वाईट स्पर्श” हा लघुपट राज्यभर महिला आयोगाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येईल. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, बाळासाहेब म्हस्के, पंचायत समिती शिक्षण विभाग वैजापूर, लासूरगाव केंद्रप्रमुख हनुमंत कोळसे, केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जाधव आणि इतर शिक्षक, गावकरी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

 

You may have missed